भुरकाबाई.

माणसाच्या लहानपणच्या गोष्टी विसरता येत नाहित. तसेच काही व्यक्ती अशा असतात की विसरणे शक्य नसते, त्यात आमच्या भुरकाबाई येतात.
भुरकाबाई म्हणजे कोणी फार श्रीमंत वगैरे व्यक्ती नव्हती तर आमच्याकडे भांडे व इतर कामांसाठी असलेली बाई. आई वडिलांसोबत आमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती.
खरतंर आदिवासी असुनही घरातली सर्व कामे अतिशय स्वच्छ तसेच काटेकोर. तसेच आम्हाला फिरायला नेणे व गॊष्टी सांगणे या मुळे आम्हाला तिची अजुनही आठवण येते.
आमच्या लहानपणी तब्येतीला काही झाले तर तिच्या आदिवासी रिवाजा प्रमाणे पहिला उपाय तिचा असायचा व त्यानंतर डॉक्टरचा ! तिच्या हातात काय जादू होती देव जाणे पण लगेच बरे वाटायचे.
भुरकाबाईच्या हाताची आणखी एक गोष्ट, तिच्या हाताचे लिंबाचे लोणचे, तिला जावून बरिच वर्षे लोटली पण त्या तिच्या आठवणींसोबत त्या लोणच्याची चव अजुनही जिभ विसरली नाही.