आमच्या निर्मला काकू नावाप्रमाणेच निर्मल. आमच्या लहान पणी काकूने आमच्या सगळ्या छळाला कायम ह्सुनच उत्तर दिले. आणी आई रागावल्यास सांगायची "अग जाउ दे लहान मुले आहेत मस्ती करणारच".
काकू सुट्टीत गावी गेल्यावर तिची वाट बघणे आम्हाला फारच त्रासदायक वाटायचे. ती होतीच तशी येताना आमच्यासाठी तिच्या पिशवीत भरपूर काहीतरी आणायचीच.
निर्मला काकूंना मी कायम हसतमुख बघीतले आहे. सकाळी लौकर उठणे, फिरायला जाणे येताना भेटणार त्याच्याशी गप्पा व फुले आणणे, फूले देवासमोर ठेवताना नमस्कार करणे व इतर कामाला लागणे तिचा आवडीचा कार्यक्रम.
त्या दिवशीपण कार्यक्रम असाच सुरू झाला. काकू परत आल्या व देवासमोर वाकल्या. बराच वेळ उठल्या नाहीत म्हणुन वहिनी बघायला गेल्या तर...........
काकू नमस्कार करताना देवाकडेच गेल्याहोत्या कायमच्याच..............