भुरकाबाई.

माणसाच्या लहानपणच्या गोष्टी विसरता येत नाहित. तसेच काही व्यक्ती अशा असतात की विसरणे शक्य नसते, त्यात आमच्या भुरकाबाई येतात.
भुरकाबाई म्हणजे कोणी फार श्रीमंत वगैरे व्यक्ती नव्हती तर आमच्याकडे भांडे व इतर कामांसाठी असलेली बाई. आई वडिलांसोबत आमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती.
खरतंर आदिवासी असुनही घरातली सर्व कामे अतिशय स्वच्छ तसेच काटेकोर. तसेच आम्हाला फिरायला नेणे व गॊष्टी सांगणे या मुळे आम्हाला तिची अजुनही आठवण येते.
आमच्या लहानपणी तब्येतीला काही झाले तर तिच्या आदिवासी रिवाजा प्रमाणे पहिला उपाय तिचा असायचा व त्यानंतर डॉक्टरचा ! तिच्या हातात काय जादू होती देव जाणे पण लगेच बरे वाटायचे.
भुरकाबाईच्या हाताची आणखी एक गोष्ट, तिच्या हाताचे लिंबाचे लोणचे, तिला जावून बरिच वर्षे लोटली पण त्या तिच्या आठवणींसोबत त्या लोणच्याची चव अजुनही जिभ विसरली नाही.

विश्वासघात.

        काल नविन बरेच दिवसांनी भेटला. म्हणाला चेन्नईला होतो कंपनीच्या कामासाठी. कालच Bombayला परतलो. त्याचे Bombay ऐकून माझा स्क्रू ढिला झाला. त्याला म्हटले कारे तुम्ही चेन्नई म्हणता तर मुंबई म्हणायला काय होते.
        तर तो म्हणाला चेन्नईत मद्रास म्हणणे म्हणजे मारच खावा लागेल.
        त्याला म्हणालो तु मुंबईतच हिम्मत करू शकतोस Bombay म्हणायची.
तर त्याने मलाच मराठी माणसावर मोठ्ठे भाषण दिले. मराठी माणसाने काय करायला हवे या विषयावर.
        खरच मराठी माणसाचे कुठे चुकते ?
        कां आपण मुंबई म्हणू शकत नाही ?  
        आपले मराठी रिक्षावाले कुठेही नेत नाहीत ?
        आपली दुकाने  १ ते ४ बंद ठेवायलाच हवीत कां ?
        आपण आपल्या माणसांना कधि न्याय देणार ? 
आणि हो,
        मराठी माणुस मराठी माणसाचाच विश्वासघात करणे कधि बंद करणार ?
 
मी या प्रश्नांची उत्तरे शोधतोय.